Eknath Shinde : राज्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येईल

राज्यात आरोग्य क्षेत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना त्यांचीच आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal
Summary

राज्यात आरोग्य क्षेत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना त्यांचीच आहे.

नारायणगाव - राज्यात आरोग्य क्षेत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना त्यांचीच आहे. आरोग्य व्यवस्थेला रुग्णवाहिका, आवश्यक पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ पुरवून राज्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील रंगशारदा सभागृह झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र व एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या वेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या डॉक्टर- वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करताना अतिशय आनंद होत आहे. कोरोना काळात राज्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते.

मुंबईत २५० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. घराशेजारी आरोग्य व्यवस्था पुरविण्यासाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. मातामृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करेल. अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार प्राप्त संस्था, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पत्रकार -

● खासगी वैद्यकीय व्यावसायिक : डॉ. सदानंद राऊत, (सर्प व विषबाधा तज्ञ - विघ्नहर मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव, ता. जुन्नर, जिल्हा पुणे.)

● स्वयंसेवी संस्था - हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर, जिल्हा उस्मानाबाद.)

● डॉक्टर्स- डॉ. प्रमोद पोतदार (वैद्यकीय अधीक्षक - शरीर विकृती शास्त्र, ग्रामीण रुग्णालय, अमरावती.)

डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक - सेवा रुग्णालय, कोल्हापूर,

● पत्रकार :- संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे.

● आरोग्य कर्मचारी - धर्मा विश्वासराव वानखेडे, (आरोग्य सहाय्यक, अमरावती). मिलिंद मनोहर लोणारी (स्वच्छता निरीक्षक, जळगाव), प्रशांत संभाप्पा तुपकरी (आरोग्य कर्मचारी, हिंगोली), किशोर वैद्य (आरोग्य कर्मचारी, नागपूर) दिलीप बाबूराव कचेरे (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com