अजितदादा, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सहभागी झाल्याची चित्रे टीव्हीवर पाहिल्यानंतर आता सगळे सुरळीत होते आहे, याची बारामतीकरांना खात्री पटली. मात्र, तरीही अजित पवार यांनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये त्या दृष्टिकोनातून काही पदाधिकाऱ्यांनी हा फ्लेक्स लावला असल्याची चर्चा आहे.

बारामती : ''दादा आपण राज्यात विक्रमी मताधिक्‍याने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे. आपण थांबू शकत नाही, त्यामुळे आपण काय करायचं याचा निर्णय बारामतीकर म्हणून आता आम्हाला घेऊ द्या.....भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय.. ''अशा आशयाचा फ्लेक्‍स आज बारामती शहरातील तीन हत्ती चौकामध्ये लावण्यात आला होता.

Image may contain: Manoj Waghmare and Nilesh Sonawane, people smiling
 

या फ्लेक्सवर अजित पवार यांच्या पाठीमागे शरद पवार यांचीही छायाचित्रे ठळकपणे दिसून येत आहे. बारामतीत आज लागलेल्या या फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. काल अजित पवार यांनी भाजपच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केल्यानंतर बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

डेस्टिशन वेडिंगचा विचार करताय? मग आता मिळेल लोन

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सहभागी झाल्याची चित्रे टीव्हीवर पाहिल्यानंतर आता सगळे सुरळीत होते आहे, याची बारामतीकरांना खात्री पटली. मात्र, तरीही अजित पवार यांनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये त्या दृष्टिकोनातून काही पदाधिकाऱ्यांनी हा फ्लेक्स लावला असल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटलांची संधी हुकली; मंत्रिपदावर 'यांची' लागणार वर्णी

आपल्याला बारामतीकरांनी निवडून दिले असल्यामुळे आपण काय करायचे याचा निर्णय बारामतीकरांना घेऊ द्या, असेच या फेलक्सद्वारे बारामतीकरांना सुचवायचे आहे.

भाजपला आणखी एका पक्षाचा रामराम; महाविकासआघाडीची संख्या झाली...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra is looking at Ajit pawar as the future Chief Minister Said Baramati People