कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांत पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे - कोकणासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत पावसाची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली. राजस्थानच्या नैॡत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे; तर बिहार ते ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून, हा पट्टा झारखंडच्या अंतर्गत भागात दाखल होण्याची शक्‍यता आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमृतसर, मोरादाबाद, बाराबंकी, पटना, बंकुरा ते बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, केरळ आणि पश्‍चिम बंगालच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे; तर छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, ओडिशा, आसाम आणि मेघालय, विदर्भ, रायलसीमा, आंध्र प्रदेश, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा व तमिळनाडूच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा मॉन्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

केरळच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती केरळ ते अरबी समुद्र या दरम्यान असून, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा पट्टा मध्य महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे महाबळेश्‍वर, नगर, औरंगाबाद, रत्नागिरी या भागांत पाऊस पडत आहे; तर कोलकता येथे सर्वाधिक पाऊस पडला. हार्बर, कृष्णानगर, इंफाळ, रायपूर, अजमेर, उज्जैन येथेही जोरदार पाऊस पडला.  

शहरात सरींची शक्‍यता
शहरातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ३३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानाचा पारा २.६ अंश सेल्सिअसने वाढून २३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. 

Web Title: maharashtra news weather rain