कोरोनाकाळात पुण्यात २,६४९ टन वैद्यकीय कचरा ;महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती 

कोरोनाकाळात पुण्यात २,६४९ टन वैद्यकीय कचरा ;महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती 

पुणे - कोरोनाकाळात पुणे शहरात आतापर्यंत दोन हजार ६४९ टन जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाली असून, त्यापैकी एक हजार ७५ टन कचरा हा केवळ कोरोनामुळे निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नुकतीच मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंतची आकडेवारी दिली आहे. 

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन, औषधे, मास्क, पीपीई किट सारख्या वैद्यकीय साधनांमुळे गेल्या अकरा महिन्यातील ही एकत्रित आकडेवारी आहे. यानुसार शहरात सर्वाधिक जास्त ‘कोविड १९’ जैव वैद्यकीय कचरा हा जुलै २०२० (१९८ टन) तर पिंपरी चिंचवड येथे सप्टेंबर २०२० (५५ टन) मध्ये निर्माण झाला होता. पिंपरी चिंचवडच्या तुलनेत शहरात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यातून स्पष्ट झाले. 

गेल्या महिन्यात केंद्रीय प्रदूषण मंडळाने जाहीर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोविड १९ जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाली होती. तर पुण्यात कोरोना काळामध्ये ५० किलोग्रॅम पासून ते कित्येक मेट्रीक टन इतका कोविड १९ जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन करण्यात आले होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आता शहरात कोविड वगळता सामान्य जैव वैद्यकीय कचऱ्याच्या निर्मितीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 

हा कचरा गेला कुठे? 
पुणे जिल्ह्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी चार प्रक्रीया केंद्र आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव आणि बारामती अशा या चार ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येते. सामान्य वैद्यकीय कचऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या ‘कोविड १९’ जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील प्रकल्प सुविधांचा अभाव जाणवू लागला होता. त्यामुळे काही प्रमाणात हा ‘कोविड १९’ जैव वैद्यकीय कचरा मुंबईतील तळोजा कचरा प्रकल्पाला पाठविण्यात येत होता. तळोजा येथे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले. सध्या रुग्ण संख्या कमी होत असताना ‘कोविड १९’ जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशी माहिती ‘एमपीसीबी’द्वारे देण्यात आली. 

कोरोनाकाळातील आव्हाने 
- जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी वाहनांची कमतरता 
- कचरा गोळा करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता 
- कोविड-१९ जैव वैद्यकीय कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे व्यवस्थापनेसाठीची असुविधा 

कोविड-१९ वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन 
- प्रत्येक रुग्णालयाला बारकोड सिस्टिम 
- वैद्यकीय कचरा प्रक्रियेसाठी पोचला का यावर लक्ष ठेवणे सोपे 
- वैद्यकीय कचऱ्यातील प्रकार कोणते या आधारावर ‘कलर कोड’ देणे 
- ‘कलर कोड’ प्रमाणे वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण 
- वर्गीकरणानुसार कचरा संबंधित केंद्रांवर पाठविण्यात येतो 

अकरा महिन्यात निर्माण झालेला जैव वैद्यकीय कचरा (आकडेवारी टनांमध्ये) 
२०२० मध्ये - पुणे शहर पिंपरी-चिंचवड 
महिना - कोविड-१९ - सामान्य वैद्यकीय - कोविड १९ - सामान्य वैद्यकीय 
मार्च - २.३५ -१६५.३८ - ०.५८० - ४३.०८ 
एप्रिल - १५.९७ - ९२.८८ - २.०७ - २३.६६ 
मे - ६३.४१ - १०९.१२५ - ४.०४ - २९.१६ 
जून - १२६.९२ - १३०.३७ - ६.८२ - ३५.५८ 
जुलै - १९८.४८ - १३६.६८ - २०.७४ - ३५.९३ 
ऑगस्ट - १४२.५६ - १३०.९१ - ३६.१० - ३४.७० 
सप्टेंबर - १७१.८९ - १४२.२४ - ५५.१४ - ३८.२३ 
ऑक्टोबर - १३८.५७ - १६०.७८ - ४३.६८ - ४१.०१ 
नोव्हेंबर - ७५.८८ - १५४.४९ - २१.०६ - ३५.६९ 
डिसेंबर - ७६.४८ - १७४.७३ -२१.८८ - ४०.२९ 
जानेवारी (२०२१) - ६३.०४ - १७६.५८ - १४.२६ - ४०.०१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com