पुण्यातील कोरोनाची आकडेवारी धक्कादायक; मुंबई-ठाण्यालाही टाकलं मागे

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 30 August 2020

आतापर्यंत राज्यात 40 लाख 84 हजार 754 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 7 लाख 80 हजार 689 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  चाचण्या घेतलेल्यांपैकी पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचं प्रमाणही कमी असून ते 19.11 टक्के इतकं आहे.

पुणे - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक गाठत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजुला बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची बाब दिलासादायक आहे. 30 ऑगस्टला आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एका दिवसात 7 हजार 690 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 62 हजार 401 इतकी झाली आहे. यामुळे रिकव्हरी रेटही वाढला असून तो 72.04 टक्के इतका झाला आहे. रविवारी दिवसभरात 16 हजार 408 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. तर 296 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 24 हजार 399 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर हा 3.13 टक्के इतका आहे. 

'अबतक' 68 भाग... 'मन की बात' कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

आतापर्यंत राज्यात 40 लाख 84 हजार 754 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 7 लाख 80 हजार 689 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  चाचण्या घेतलेल्यांपैकी पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचं प्रमाणही कमी असून ते 19.11 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 13 लाख 9 हजार 676 जण होम क्वारंटाइन आहेत. तर 35 हजार 373 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सध्या 1 लाख 93 हजार 548 कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत पुण्यात 1 लाख 73 हजार 174 कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यापैकी 1 लाख 17 हजार 205 जण बरे होऊन घरी परतले. तर 4 हजार 60 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक 51 हजार 909 रुग्ण पुण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यानंतर ठाणे आणि मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या जास्त आहे. ठाण्यात 20 हजार 976 रुग्ण सक्रीय असून मुंबईत 20 हजार 321 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक आणि नागपुरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. नाशिकमध्ये 11 हजार 703 सक्रीय रुग्ण आहेत. तर नाशिकमध्ये 11 हजार 574 रुग्णांवर उपचार केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra reports 16408 new COVID19 cases highest 51,909 cases in Pune