वाड-मयीन पुरस्कारासाठी वाचक सुचविणार पुस्तके 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे  - वाचकहो, तुम्हाला आवडलेली पुस्तकांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषदेला कळवा. यंदापासून वाचकांच्या पसंतीच्या पुस्तकांची निवड वाड-मयीन पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. परिषदेच्या कार्यकारिणीने या निर्णयाची अंमलबजावणी या वर्षीपासूनच करायची ठरविले असून, त्याकरिता वाचकांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारांतील पुस्तकांची नावे परिषदेला 22 एप्रिलपर्यंत कळवायची आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

कथासंग्रह, कादंबरी, नाट्य, इतिहास, ललित, मानसशास्त्र, समाजशास्त्र, स्त्रीविषयक, बालवाड-मय, वैचारिक, सामाजिक, बॅंकिंग, संतवाड-मय, पौराणिक कथा, रामायण-महाभारतावर आधारित वाड-मय, आरोग्य, औषधनिर्माण, वैद्यकशास्त्र अशा विविध साहित्य प्रकारांतील पुस्तके, लेखक व प्रकाशकांची नावे वाचकांनी masaparishad@gmail.com या ई-मेलवर कळवावीत, असे आवाहनही परिषदेने वाचकांना केले आहे. 

प्रा. जोशी म्हणाले, ""वाचक हे चोखंदळ असतात. त्यांच्या पसंतीच्या पुस्तकांची नावे त्यांनी कळविली, तर परीक्षकांनाही पुरस्कार निवडीकरिता उपयुक्त ठरू शकते, कारण पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात येतात. मात्र, जेवढी पुस्तके येतील त्यातूनच परीक्षकांना निवड करावी लागते. अन्य वाड-मय प्रकारातील पुस्तकेही परीक्षकांसमोर यावीत. पुरस्कारांचा दृष्टिकोन व्यापक व्हावा, या उद्देशाने मसापने हा निर्णय घेतला आहे.'' 

मसापने राबविलेले विशेष उपक्रम 
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सातत्याने राज्यकर्त्यांकडे पाठपुरावा 
- दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या सहकार्याने कामाला सुरवात 
- जयदेव गायकवाड यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या चार लक्ष रुपयांतून ग्रंथालयातील सुधारणांना सुरवात 
- मराठी-पंजाबी या भाषाभगिनींमधील स्नेह वाढावा, यासाठी पंजाबी साहित्य अकादमीसमवेत सामंजस्य करार 
- प्रकाशकांनी सुरू केलेल्या वाचन-जागर महोत्सवात सक्रिय सहभाग 
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऐंशी टक्के नव्या लेखक-कवींना स्थान, ग्रामीण भागाला प्राधान्य 
- "पुण्याबाहेरील कार्यवाह' यांची "विभागीय कार्यवाह' म्हणून ओळख 

Web Title: maharashtra sahitya parishad Books for suggesting readers for the award