आंबेगाव : वळसे पाटील 41602 मतांनी आघाडीवर  | Election results 2019

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मंचर (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्याच फेरी पासून जोरदार मुसंडी घेतली आहे. सतराव्या फेरीअखेर वळसे पाटील यांना 41 हजार 602 मतांनी आघाडीवर आहेत.

मंचर (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्याच फेरी पासून जोरदार मुसंडी घेतली आहे. सतराव्या फेरीअखेर वळसे पाटील यांना 41 हजार 602 मतांनी आघाडीवर आहेत.

सतराव्या फेरीत वळसे पाटील यांना 85870 तर शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना 44268 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून घेतलेली दणदणीत आघाडी वळसे पाटील यांनी सतराव्या फेरीअखेरही कायम राखली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात वळसे पाटील विजयाची परपंरा राखणार, की शिवसेनेचे बाणखेले विजयी होणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, पहिल्याच फेरीपासून वळसे पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 

शिवसेनेकडून उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, अक्षय आढळराव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर, सुनील बाणखेले, लक्ष्मणराव काचोळे, विजयराव आढारी, सचिन बांगर, मालती थोरात, दादू देठे यांच्या नेतृत्वाखाली वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना भाजपचे तालुका अध्यक्ष संजय थोरात व जयसिंग एरंडे यांच्यासह मित्रपक्षांची साथ मिळाली आहे. 

वळसे पाटील यांच्यासाठी, त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील, पुतणे विवेक वळसे पाटील हे प्रचारासाठी फिरत आहेत. देवेंद्र शहा, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, देवदत्त निकम, वसंतराव भालेराव, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार, यशवंत पाचंगे, माजी खासदार (स्व.) किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव रामदास बाणखेले, नातू युवराज बाणखेले, कैलासबुवा काळे, सुभाष मोरमारे, प्रभाकर बांगर आदी कार्यकर्ते प्रचार यंत्रणा राबवत आहेत. 

"वळसे पाटील यांनी तीस वर्षांत काय विकास केला' असा प्रश्‍न व "भगवा या वेळी फडकणार' असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. "वळसे पाटील यांच्याबरोबर विरोधक होते, त्या वेळी त्यांना विकास दिसत होता, आता दिसत नाही, हे दुर्दैव आहे. विजय हा औपचारिक आहे. विक्रमी मताधिक्‍याविषयी उत्सुकता आहे,'' असे उत्तर राष्ट्रवादीकडून दिले जाते. 

पवार, ठाकरे आंबेगावला आलेच नाहीत 
वळसे पाटील यांच्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सभा झाली. खेड व जुन्नर तालुक्‍यात ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या; पण आंबेगावला हे दोन्ही नेते आलेच नाहीत. प्रथमच दोन दिग्गज नेते विधानसभेसाठी न आल्याची चर्चा होत आहे. 

राष्ट्रवादीचा स्वच्छ चेहरा 
दिलीप वळसे पाटील हे सातव्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. सलग सहा वेळा त्यांनी विजय मिळविलेला आहे. त्यांनी ऊर्जामंत्री, विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजविली आहे. शरद पवार यांचे विश्‍वासू व एकनिष्ठ सहकारी, अशी त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

आक्रकम प्रचार                                         
राजाराम बाणखेले हे आंबेगाव पंचायत समितीचे अपक्ष सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. आक्रमक प्रचारामुळे ते चर्चेत आले होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election ambegaon trends afternoon