दौंड : अटीतटीच्या लढतीत राहुल कुल यांचा विजय | Election Results 2019

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे 673 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत कुल यांनी बाजी मारली.

दौंड मतदारसंघातील 3,09, 168 मतदारांपैकी 212415 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 114222 पुरूष, 98192 महिला व 1 तृतीयपंथीय यांचा समावेश आहे. आज (ता. 24) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली.

अखेरच्या फेरीत भाजप उमेदवार राहुल कुल यांना 102763 तर राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांना 102090 मत मिळाली आहेत. 126 मतदारांनी नोटा चा पर्याय स्वीकारला. मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या झाल्या.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Daund final result bjp Rahul kul won