दौंड : भाजपचे राहुल कुल 8183 मतांनी आघाडीवर  | Election Results 2019

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दौंड (पुणे)  : दौंड मतदारसंघात राहुल कुल (भाजप) चौथ्या फेरीअखेर 8183 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत भाजपच्या राहुल कुल यांना 25855 
तर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना 17672
मते मिळाली आहेत.

दौंड (पुणे)  : दौंड मतदारसंघात राहुल कुल (भाजप) चौथ्या फेरीअखेर 8183 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत भाजपच्या राहुल कुल यांना 25855 
तर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना 17672
मते मिळाली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफुला (ता. दौंड) येथील प्रचारसभेत पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल यांना मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळविल्यास मंत्रिपद देण्याचा शब्द दिल्याने मतदार राहुल कुल यांना दुप्पट मताधिक्य देणार का ?, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश थोरात यांचा ११३४५ मतांच्या फरकाने पराभव केला होता. मुख्यमंत्री यांच्या अटीप्रमाणे मंत्री होण्यास राहुल कुल यांना किमान २२६९० मतांचे मताधिक्य मिळवावे लागणार आहे.

दौंडची मतदारसंख्या ३, ०९, १६८ इतकी असून यंदा ६८. ७१ टक्के मतदान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात महाजनादेश यात्रेनिमित्त वरवंड येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री यांनी आमदार राहुल कुल यांनी मागील निवडणुकीपेक्षा तिप्पट मताधिक्य मिळविल्यास मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. परंतु महिन्याभरातच त्यांनी आपल्या जाहीर शब्दात बदल करीत ` तुम्ही दुप्पट मताधिक्याने आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो ` अशी ग्वाही दिली होती. महिन्याभरात भाजप आणि खासगी संस्थांनी केलेले सर्वेक्षण आणि प्रचारकाळात राष्ट्रवादीचे उमेदवार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केल्याचे अहवाल आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदासाठीची अट तिपटीवरून दुपटीवर आणल्याची चर्चा आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election daund trends early morning