इंदापूर : भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा दुसऱ्यांदा पराभव | Election Results 2019

indapur1.jpg
indapur1.jpg

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे 3027 मतांनी विजय मिळविला आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आहे. मागील विधानसभा निवडणूक सन 2009 मध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या लढतीत हर्षवर्धन पाटील यांनी सुमारे 8 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्याचा वचपा मामांनी 2014 मध्ये सुमारे 15 हजार मतांनी भाऊंचा पराभव करून घेतला.

विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील भरणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक म्हणजे साडे तेरा कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com