पुंरदर : अजित पवार यांनी करून दाखविले; पुरंदरमधून शिवतारे यांचा पराभव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लाेकसभेच्या निवडणुकीदरम्यान विजय शिवतारे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जाेरदार  टीका केली हाेती. त्याच दरम्यान अजित पवार यांनी बारामतीच्या सांगता सभेत बघताेच विजय शिवतारे कसा निवडून येताे ते, असा इशाराच दिला हाेता. अजित  पवार यांनी बाेलल्याप्रमाणे करून दाखविले आहे. 

सासवड : लाेकसभेच्या निवडणुकीदरम्यान विजय शिवतारे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जाेरदार  टीका केली हाेती. त्याच दरम्यान अजित पवार यांनी बारामतीच्या सांगता सभेत बघताेच विजय शिवतारे कसा निवडून येताे ते, असा इशाराच दिला हाेता. अजित  पवार यांनी बाेलल्याप्रमाणे करून दाखविले आहे. 

आज लागलेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालात विद्यमान मंत्री शिवतारे यांचा पराभव झाला असून, संजय जगताप आता पुरंदरचे आमदार झाले आहेत.    

अगोदर जनतादलाचा बालेकिल्ला असलेल्या पुरंदर विधानसभा मतदार संघ सन 2004 पासून एक पंचवार्षिक राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. पण 2009 पासून लागोपाठ दोनदा खेचून आणण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यशस्वी झाले. तर पुढे 2014 च्या शेवटच्या लढाईपासून क्रमांक दोनला संजय जगताप यांच्या रुपाने काँग्रेसच राहीली. अशातच यंदाची निवडुक शिवसेना-भाजप युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळ झाली. या लढाईतजगताप यांनी बाजी मारली.

जगतापांची जमेची बाजू- संस्थात्मक जाळे मोठे, रोजगार संधी, अर्थसहाय देण्यात आघाडीवर * सासवड व जेजुरी नगरपालिका ताब्यात व कामांवरही भर * जिल्हा बँक संचालक, विकास सोसायट्यांवर प्रभुत्व * राष्ट्रवादी काँग्रेसची यंदा प्रथमच चांगली साथ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election pune purdar final result sanjay jagtap won