भोर ; संग्राम थोपटे आघाडीवर election result 2109

विजय जाधव
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

 भोर विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत काॅंग्रेसचे संग्राम थोपटे यांनी 171 मतांची अल्प आघाडी घेतली आहे. या सात उमेदवार रिंगणात असले तरीही मुख्य लढत ही कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, शिवसेना-भाजपा युतीचे कुलदीप कोंडे आणि अपक्ष आत्माराम कलाटे यांच्यामध्येत तिरंगी लढत आहे.

भोर (पुणे) ; भोर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर काॅंग्रेसचे संग्राम थोपटे यांनी 1475 मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात सात उमेदवार रिंगणात असले तरीही मुख्य लढत ही कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, शिवसेना-भाजपा युतीचे कुलदीप कोंडे आणि अपक्ष आत्माराम कलाटे यांच्यामध्येत तिरंगी लढत आहे.

पहिल्या फेरीत संग्राम थोपटे यांना 3886, कोंडे यांना 3715, तर कलाटे यांना 847 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत थोपटे यांना 9736, कोंडे यांना 8261, तर कलाटे यांना 1812 मते मिळाली आहेत. 

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांची उमेदवारी जाहीर असल्याने त्यांनी काही महिन्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी शिवसेनेची रथयात्रा काढून प्रचार केला आहे. तर अपक्ष उमेदवार यांनी निवडणूकीपूर्वीच आपल्या प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून त्यांना स्थानिक नाराजींची साथ आहे. तिकीटासाठी युतीच्या उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत रस्सीखेच सुरु होती. अखेर कुलदीप कोंडे यांनी बाजी मारली आणि युतीचे तिकीट मिळविले. परंतु युतीच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले आत्मराम कलाटे यांनी उमेदवारी जाहीर केल्यापासून त्यांना मिळत असलेल्या पाठींब्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडूकीला सामोरे जात आहेत. याशिवाय मनसेचे अनिल मातेरे, वंचित आघाडीचे भाऊ मरगळे, संभाजी ब्रिगेडचे पंढरीनाथ सोंडकर आणि अपक्ष मानसी शिंदे आपापल्या परीने निवडणूकीला सामोरे जात आहेत. 

मतांची विभागणी शक्य
तिन्ही प्रमुख उमेदवारांनी विजयाची खात्री आहे. परंतु मतदारांच्या मनातील संभ्रमावस्ता पाहता मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. आपल्या तालुक्यातील स्थानिक उमेदवाराला मतांचे प्राधान्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील उमेदवार विजयासाठी मतांची गणिते मांडत आहेत. आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्यावरील नाराजीमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते त्यांना मिळतील हे सांगणे कठीण होणार आहे. तसेच युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनाही भाजपाची मते मिळतील हेदेखील ठामपणे सांगता येणार नाही. राष्ट्रवादी कॉग्रेसची काही मते ही अपक्ष आत्माराम कलाटे यांना जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019 election result Bhor trends morning