भोसरीत लांडगे यांचा ३० हजाराचा टप्पा पार Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी ८ व्या फेरी अखेर ३०,७४४ मतांच्या आघाडीचा टप्पा पार केला आहे.

पिंपरी - भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी ८ व्या फेरी अखेर ३०,७४४ मतांच्या आघाडीचा टप्पा पार केला आहे. 

८ व्या फेरीत लांडगे यांना ८,५६५ मते, लांडे यांना ४०३६ मते पडली. या फेरी अखेर लांडगे यांच्या पारड्यात मतदारांनी ६४,५३५ मते टाकली आहेत. 

तर लांडे यांना ३३,७९१ मतेच मिळविता आली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख यांना ८ व्या फेरीत ५१५ मते तर एकूण ४६२७ घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhan sabha 2019 election result Bhosari mahesh landage