दौंड  : जेवणाची सुट्टी अन् कार्यकर्ते काळजीत | Election Results 2019

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दौंड (पुणे) : दौंड मतदारसंघामध्ये प्रत्येक फेरीनुसार कमी कमी होत जाणाऱ्या मतांच्या फरक विसाव्या फेरी अखेर ५२५ मतांपर्यंत आला.त्यामुळे शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये कोण आघाडी घेऊन विजय मिळवणार याची उत्कंठा ताणलेली असताना निवडणूक कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणासाठी सुट्टी घेतल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. मतमोजणीला होणारा विलंब कार्यकर्ते व समर्थकांच्या काळजीचा ठोका वाढविणार ठरत आहे. 

दौंड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अंतर्गत पाचवी फेरी सकाळी साडेदहा वाजता, दहावी फेरी दुपारी पावणे बारा वाजता तर दुपारी ३ वाजता मिनिटांनी २० वी फेरी पूर्ण झाली. विससाव्या फेरीअखेर भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे प्रतिस्पर्धी तथा राष्ट्रवादी उमेदवार रमेश थोरात यांच्यापेक्षा अवघ्या ५२५ मतांनी आघाडीवर आहेत. 

दौंड मतदारसंघातील ३,०९, १६८ मतदारांपैकी २१२४१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विसाव्या फेरीअखेर २१२४१५ मतांपैकी १९३०८८ मतांची मोजणी झालेली आहे. ८५७ मतदारांनी नोटा चा पर्याय स्वीकारला. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या आहेत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Daund trends middle phase