खडकवासला : भिमराव तापकीरांचे कमबॅक; दोडके पिछाडीवर | Election Results 2019

Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Khadakwasla trends first phase
Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Khadakwasla trends first phase

पुणे : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भिमराव तापकीर २१८४ मतांनी आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे सचिन दोडके आतापर्यंत आघाडीवर होते, त्यांना मागे टाकत पुन्हा एकदा विद्यमान आमदार तापकीरांनी कमबॅक केलं आहे.  

मतमोजणी फेरी : २०

भीमराव तापकीर (भाजप) : १०५९२८
सचिन दोडके ( राष्ट्रवादी ) : १०३७४४
तापकीर यांना मिळालेले मताधिक्य : २१८४

भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात खडकवासला मतदारसंघात थेट लढत होत आहे.

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये निर्माण झालेल्या खडकवासला मतदारसंघातून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. त्यांचे निधन झाल्याने, पोटनिवडणुकीत तापकीर निवडून आले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये तापकीर पुन्हा विजयी झाली. यावेळी त्यांची हॅट्रीक होणार का, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com