दौंड : आमदार राहुल कुल आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दौंड : मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे ६३३९ मतांनी आघाडीवर आहेत. 

दौंड : मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे ६३३९ मतांनी आघाडीवर आहेत. 

दौंड मतदारसंघातील ३,०९, १६८ मतदारांपैकी २१२४१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये ११४२२२ पुरूष, ९८१९२ महिला व १ तृतीयपंथीय यांचा समावेश आहे.आज (ता. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्या फेरीत राहुल कुल यांनी ४६१०, दुसरी - ७५३१, तिसरी- ७८५२, चौथी - ८१८३ व पाचव्या फेरीअखेर ६३३९ मतांची आघाडी मिळाली. पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार राहुल कुल यांना २९७६५ तर राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांना २३४२६ मते मिळाली होती. १२६ मतदारांनी नोटा चा पर्याय स्वीकारला. मतमोजणीच्या एकूण २२ फेर्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result pune daund trends afternoon