मावळ : शेळके यांची 13542 मतांनी आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पाचव्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर 13542 मतांनी आघाडी घेतली आहे.

मावळ (पुणे) : राज्यातील चुरशीच्या लढतीत समावेश असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात निकालाच्या पाचव्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर 13542 मतांनी आघाडी घेतली आहे. शेळके यांना 30195 मते तर भेगडे यांना 11647 मते मिळाली. 
 

मावळ मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात आहे. 2009 आणि 2014 मध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले. त्यानंतर ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहे.

पूर्वाश्रमीचे भाजपचे निष्टावान कार्यकर्ते असलेले सुनील शेळके हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात दाखल झाले. त्यामुळे भाजपचेच असलेल्या दोन उमेदवार या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर
उभे ठाकले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pune Maval