मावळ : सुनिल शेळके विजयाच्या दिशेने | Election Results 2019

मावळ : सुनिल शेळके विजयाच्या दिशेने | Election Results 2019

मावळ (पुणे) : राज्यात चुरशीच्या लढतपैकी एक असलेली मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल शेळके यांनी मोठे मताधिक्य घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सातव्या फेरीअखेर 27 हजार 210 मतांची आघाडी घेऊन निकालामध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

मावळ मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात आहे. 2009 आणि 2014 मध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले. त्यानंतर ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहे.

पूर्वाश्रमीचे भाजपचे निष्टावान कार्यकर्ते असलेले सुनील शेळके हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात दाखल झाले. त्यामुळे भाजपचेच असलेल्या दोन उमेदवार या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com