मावळ : राज्यमंत्री भेगडे पिछाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पहिल्या फेरीअखरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर 4937 मतांनी आघाडी घेतली आहे. 

मावळ (पुणे) : राज्यातील चुरशीच्या लढतीत समावेश असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात निकालाच्या पहिल्या फेरीअखरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर 4937 मतांनी आघाडी घेतली आहे. 

मावळ विधानसभा मतदारसंघात सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु खरी लढत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यातच दिसून आली.

भेगडे हे गेली दहा वर्षांपासून आमदार आहेत. ते या वेळी तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपचेच असलेले सुनील शेळके यांनी उमेदवारीत डावलल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे एकाच या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pune Mavan