पुरंदर : संजय जगताप विजयाच्या दिशेने; मंत्री शिवतारे यांना धक्का | Election Results 2019

jagtap.jpg
jagtap.jpg

सासवड (पुणे) : पुरंदर विधानसभा मतदार संघात सध्या शिवसेनेचे विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत. सध्या या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी त्यांना जाेरदार लढत दिली असल्याचे दिसून येत आहे. पुरंदर हवेली मतदार संघात संजय जगताप 12674 मतांनी आघाडीवर आहेत.

दरम्यान, अगोदर जनता दलाचा बालेकिल्ला असलेल्या पुरंदर विधानसभा मतदार संघ सन 2004 पासून एक पंचवार्षिक राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. पण 2009 पासून लागोपाठ दोनदा खेचून आणण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यशस्वी झाले. तर पुढे 2014 च्या शेवटच्या लढाईपासून क्रमांक दोनला संजय जगताप यांच्या रुपाने काँग्रेसच राहीली.

दरम्यान, अशातच यंदाची निव़डणूक शिवसेना-भाजप युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळ झाली. त्यात दोन्ही बाजूंची प्रचार, भाषणे व एकमेकांवर टिकाही तेवढीच धारदार राहीली. त्यामुळे यंदा येथे काँटे की टक्करच राहीली. त्यातून शिवतारे हे हॅटट्रीक करणार की, विरोधक त्यांची हॅटट्रीक हुकविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मतदार संघात अनेक विकासकामे झालीत, काही प्रकल्प होऊ घातले आहेत. शिवतारेंच्या या कामाला कौल मिळणार का. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधकांच्या नव्या एकीला संधी मिळणार हे आता लवकरच पुढे येणार आहे. यंदा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उमेदवार विजय शिवतारे यांनी गर्दी जमविली, त्याच्या दुप्पट गर्दी काँग्रेसच्या संजय जगताप यांनी जमविली.

दरम्यान, प्रचारात संजय जगताप यांची आघाडी राहीली. आघाडी जितकी भक्कम राहीली, तुलनेत युतीची जुळवाजुळवा काहीशी विलंबाने झाली. युती शेवटपर्यंत काहीशी विस्कळीत राहीली. मात्र आघाडी खुप आधीपासूनच भक्कम होती. त्यातून आघाडी व युती अशा दोन्ही बाजूंची टिकाही तेवढीच धारदार होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा शिवतारे यांच्यासाठी बळ देऊन गेल्या. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या सभा जगताप यांना ताकत देऊन गेल्या. त्यामुळे येथील काँटे की टक्कर अजून तापली. टिकास्त्रांचा मारा होत असताना जेवणावळ्या, नातेगोते, अमिषे, काही `अर्थ`पूर्ण हात मोकळा करण्यावरही भर राहीला.

दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा होताना- लोकच संभ्रमात पडले आहेत. आता मतमोजणीच यावर निकाल देईल. त्याची प्रतिक्षा आहे. शिवसेनेतर्फे एकदा आमदारकी व दुसऱयांदा राज्यमंत्रीपद विजय शिवतारे यांनी भोगले. मात्र यंदा काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना आघाडीची साथ मिळून साऱयांनी एक होऊन काम केले. हेच त्यांचे मोठे यश म्हणावे लागेल. तसेच शिवतारे मागील निवडणुकीत शिवसेनेतर्फे स्वतंत्र लढून जिंकले होते. आता भाजप जुन्या-नव्या नेत्यांसह त्यांच्या साथीला होती, हे त्यांचे लढाईतील काही यश म्हणावे लागेल.

पण, माजी विधान परीषध सदस्य चंदुकाका जगताप यांचे दोनवेळचे अपुरे राहीलेले आमदारकीचे स्वप्न यावेळी संजय जगताप यांनी तिसऱया संधीत पूर्ण करावे, अशी मनोमन इच्छा असणारे एकत्रित आघाडीसह खुप लोक आहेत. तर त्यांच्या पुढे आमदार, राज्यमंत्री व आता भविष्यातील कॅबिनेट मंत्री म्हणून हॅटट्रीकची आशा बाळगून शिवतारेंची महायुती झटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तशी घोषणाही करुन गेल्याने मंत्रीपदाचे काय होणार आणि जगताप यांना पहीली वहीली संधी मिळणार का., ही प्रतिक्षा आहे. या परिस्थितीत पुरंदरची लढत रंगतदार झाली आहे. आता मतदारांच्या कौलातून 'संजय' कोणाचा व `विजय` कोणाचा आहे.. हे काही वेळात ठरेल. 

 शिवतारेंची जमेची बाजू- सिमेंट बंधारे, जलयुक्त व जलसंधारणाची बरीच कामे * गुंजवणी धरण पूर्ण, पाईपलाईन दृष्टीपथात * विमानतळ, राष्ट्रीय बाजार, होऊ घातलेले प्रकल्प * पुरंदर तालुका पंचायतीची समिती एकहाती सत्ता * भाजपची साथ व राज्यात सत्ता येण्याची चिन्हे अधिक  

जगतापांची जमेची बाजू- संस्थात्मक जाळे मोठे, रोजगार संधी, अर्थसहाय देण्यात आघाडीवर * सासवड व जेजुरी नगरपालिका ताब्यात व कामांवरही भर * जिल्हा बँक संचालक, विकास सोसायट्यांवर प्रभुत्व * राष्ट्रवादी काँग्रेसची यंदा प्रथमच चांगली साथ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com