esakal | कसबा : महापौर मुक्ता टिळकांची हवा; काँग्रेस, मनसेला टाकले मागे | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Vidhan Sabha election result Kasba trends early morning.jpg

पुणे : पुण्यात कसबा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या मुक्ता टिळक 4232 मतांनी आघाडीवर आहेत. लगेचच दुसऱ्या फेरीची सुरवात होईल. 

कसबा : महापौर मुक्ता टिळकांची हवा; काँग्रेस, मनसेला टाकले मागे | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कसबा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या मुक्ता टिळक 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. लगेचच दुसऱ्या फेरीची सुरवात होईल. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे अरविंद शिंदे लढत आहेत. 

कसबा विधानसभा मतदार संघ - 
भाजप:- मुक्ता टिळक - 21270 - आघाडीवर
काँग्रेस :- अरविंद शिंदे - 9438
मनसे :- अजय शिंदे - 2680

भाजपचे गेली 25 वर्षे आमदार असलेले व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची मे महिन्यात खासदार म्हणून निवड झाल्यानंतर, भाजपने महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनावडे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने, कसबा पेठ मतदारसंघातील मुख्य लढत चौरंगी झाली आहे. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. पुण्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होती. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

मुक्ता टिळक या गेली साडेसतरा वर्षे या भागातून भाजपच्या नगरसेविका आहेत. अरविंद शिंदे यांनीही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते ही पदे भुषविली आहेत. 

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019

भाजपच्या उमेदवारांनी 1978 पासून झालेल्या निवडणुकीत 1985 चा अपवाद वगळता या मतदारसंघातून विजय मिळविला. जनता पक्ष व भाजप यांच्यातर्फे अरविंद लेले, भाजपचे अण्णा जोशी, कॉंग्रेसचे उल्हास काळोखे यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 1992 च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे वसंत थोरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. बापट 1995 पासून सलग पाच निवडणुकांत विजयी झाले.