Vidhan Sabha 2019 : मावळ : बाळा भेगडे यांच्यामुळे लोणावळ्याचा विकास - सुरेखा जाधव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

‘गेली २५ वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषविले आहे. परंतु जेव्हा भाजप शिवसेना युतीचे सरकार तालुक्‍यात आले तेव्हा कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी उपलब्ध झाला.

विधानसभा 2019 : लोणावळा - ‘गेली २५ वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषविले आहे. परंतु जेव्हा भाजप शिवसेना युतीचे सरकार तालुक्‍यात आले तेव्हा कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी उपलब्ध झाला. यामुळे आम्ही आमच्या लोणावळा शहराचा विकास करू शकलो,’’ असे मत लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले आहे.

वलवन येथे बुधवारी सकाळी भेगडे यांच्या रॅलीचे ’जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणांनी जोरदार पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्री यांच्या सभेचे पडसाद लोणावळा शहरात बुधवारी पाहण्यास मिळाले. अनेक नागरिक उस्फूर्त सहभागी झाले होते. आज वलवन, पांगोळी, तुंगार्ली, इंदिरानगर, गवळीवाडा, नांगरगाव, जुना खंडाळा, भांगरवाडी आदी परिसरामध्ये जोरदार प्रचार झाला.

जाधव यांनी बुधवारी प्रचाराची धुरा सांभाळली. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या शहराचा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी  केलेला विकास हा तालुक्‍याला मिळणाऱ्या मंत्रिपदाची साक्ष आहे. लोणावळा शहरात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून शहरासाठी पाणी योजना, कचरा डेपो, उड्डाण पूल, तळ्याचे काम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अस्तित्वात नसलेल्या अनेक रस्त्यांची कामे ज्यामुळे अनेक वाड्या वस्त्या जोडल्या गेल्या, अशी अनेक विकासकामे करण्यात आली. ज्यामुळे लोणावळा शहराची प्रगती झाली.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 bala bhegade lonavala develop surekha jadhav politics