Vidhan Sabha 2019 : बारामतीत चमत्काराचे साक्षीदार व्हा - चंद्रकांत पाटील

Chandrakant-Patil
Chandrakant-Patil

विधानसभा 2019 : बारामती शहर - बारामतीकरांनी यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करून त्याचे साक्षीदार व्हायला हवे. बारामतीत भाजपचे कमळ फुलवा, अशी हाक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

बारामती मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ शारदा प्रांगणात आयोजित सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ईडी चौकशी अशा विषयांना त्यांनी हात घातला. केंद्रात व राज्यात गेले अनेक वर्षे तुमची सत्ता होती. तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिले नाही? मराठा आरक्षणही आम्ही दिले आणि ते न्यायालयात टिकवूनही दाखवले, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील १४४ जागा जिंकण्यासाठी एक कोटी ७० लाख मतांची आवश्‍यकता लागते. मात्र, लोकसभेचा निकाल पाहता महायुतीला दोन कोटी ७४ लाख मते मिळाली आहेत. त्यामुळे २२० जागांच्या २५० होणार, असा विश्वास पाटील व्यक्त केला. राजकारणाला कंटाळलेल्या अजित पवार यांना एका दिवसातच पुन्हा राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याचा साक्षात्कार कसा काय झाला? असा सवाल पाटील यांनी केला. ज्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, अशा अजित पवारांना निवडून देणार की तरुण-तडफदार गोपीचंद पडळकर यांच्या मागे तुमची ताकद उभी करणार, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com