Vidhan Sabha 2019 : भोसरी मतदारसंघात बदल होणार - विलास लांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

‘भोसरी विधानसभा मतदारसंघातील तरुणाई समंजस आहे. त्यांना मतदारसंघ सुरक्षित व भयमुक्त हवा आहे. यासाठी त्यांनी ठरविले आहे, आता बदल करायचा,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भोसरी विधानसभा मतदारसंघातील तरुणाई समंजस आहे. त्यांना मतदारसंघ सुरक्षित व भयमुक्त हवा आहे. यासाठी त्यांनी ठरविले आहे, आता बदल करायचा,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी केले. 

प्रचारफेरीनिमित्त त्यांनी मोशी व डुडुळगावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्या वेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. त्यांचे सर्वत्र स्वागत झाले. तरुणाईकडून मिळालेला प्रतिसाद पाहून लांडे भारावून गेले. 

ते म्हणाले, ‘‘आजची तरुणाई आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याची चांगली जाण असणारी आहे. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक समजते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचा काळ कसा होता, हे त्यांना वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. चांगल्या विचारासाठी तरुण आणि तरुणींनी पुढे यावे. आपल्या सुरक्षित आणि चांगल्या भविष्यासाठी तसेच भयमुक्त शाळा, महाविद्यालये आणि भ्रष्टाचार मिटविण्यासाठी निवडणुकीत कपबशीला मतदान करावे.’’

लांडे यांच्या या दौऱ्याला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लांडे यांचे त्यांनी उत्साहात स्वागत केले. अनेकांनी पाठिंबा जाहीर केला. या वेळी अनेकांनी आपल्या अडचणी मांडल्या. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुंडगिरी वाढली आहे. आम्ही शाळा-महाविद्यालयांत सुरक्षितपणे जाऊ शकत नाहीत. मात्र, या पुढे आम्ही आता बदल करणार आहोत, असा विश्‍वास लांडे यांच्याकडे व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Bhosari Constituency changes vilas lande politics