Vidhan Sabha 2019 : भोसरी : आमदार महेश लांडगे यांना मताधिक्‍याचा निर्णय - सुलभा उबाळे

निगडी - भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ उतरलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या.
निगडी - भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ उतरलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भोसरी विधानसभा मतदारसंघात पन्नास टक्के महिला मतदार आहेत. प्रचारात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. आमदार महेश लांडगे यांच्याकडून महिलांसाठीच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता होण्यासाठी महायुतीला मोठ्या मताधिक्‍याने विजयी करावे,’’ असे आवाहन शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी येथे केले.

भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ उबाळे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीचा मेळावा यमुनानगर येथे झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पूजा महेश लांडगे, माजी नगरसेविका सुनीता गवळी, वेदश्री काळे, शशिकला उभे, जनाबाई गोरे, गौरी घंटे, रूपाली आल्हाट, नंदा दातकर, राजश्री पाटील, निर्मला पाटील, पुष्पा मुतंडीकर, मनीषा परांडे, भारती चकवे, कोमल साळुंखे, विजया जाधव, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे, श्रीदेवी लामझने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

उबाळे म्हणाल्या, ‘‘लांडगे यांच्या विजयासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. यमुनानगरमधून घराघरांतून मतदार बाहेर काढण्याची जबाबदारी महिलांनी घेतली आहे. यमुनानगरमधून त्यांना मोठे मताधिक्‍य मिळेल.’’ युवती अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com