भोसरीत जल्लोष Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

आमदार महेश लांडगे भोसरी विधान सभेत झालेल्या विजयाचा भोसरीत भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारे आतषबाजी, बाइक रॅली, भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला.

भोसरी - आमदार महेश लांडगे भोसरी विधान सभेत झालेल्या विजयाचा भोसरीत भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारे आतषबाजी, बाइक रॅली, भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला.

'एकच वादा, महेश दादा' असा जयघोष करत आमदार महेश लांडगे यांच्या निवास स्थानासमोर भाजपच्या महिला नगरसेविका कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून व नाचून आनंद साजरा केला. भोसरीतील आळंदी रस्ता, दिघी रस्ता, संत तुकारामनगर, भोसरी गावठाण,  त्याचप्रमाणे दिघी, चऱ्होली, इंद्रायणीनगर आदि भाजप नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयाजवळ भंडारा उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोस करण्यात आले. तरुण कार्यकर्त्यांनी भोसरी परिसरातून दुचाकीला भाजपचा झेंडा लावून फेरी काढली. भोसरी परिसरात भाजपचा झेंडाही जागोजागी लावण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी पेढेही वाटले. भाजपच्या नगरसेवक कार्यकर्त्यांनी लांडेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Bhosari Mahesh Landage win celebration