Vidhan Sabha 2019 : भोसरी : पराभव दिसू लागल्याने विरोधकांचे कार्यकर्ते सैरभैर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

‘मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना नगरसेवक केले. वास्तविक, अजित पवार यांचा नकार होता, तरीही मी निवडून आलो. परंतु, याची जाण न ठेवता मलाच गाडले जाईल, असे आरोप सभांमध्ये केले जात आहेत. यासाठी अतिशय खालच्या पातळीवर भाषा वापरली जात आहे. पराभव दिसू लागल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते सैरभर झाले आहेत,’’ असे प्रतिपादन भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, माजी आमदार विलास लांडे यांनी केले.

विधानसभा  2019 : पिंपरी - ‘मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना नगरसेवक केले. वास्तविक, अजित पवार यांचा नकार होता, तरीही मी निवडून आलो. परंतु, याची जाण न ठेवता मलाच गाडले जाईल, असे आरोप सभांमध्ये केले जात आहेत. यासाठी अतिशय खालच्या पातळीवर भाषा वापरली जात आहे. पराभव दिसू लागल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते सैरभर झाले आहेत,’’ असे प्रतिपादन भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, माजी आमदार विलास लांडे यांनी केले.

भोसरीतील गावजत्रा मैदानावर झालेल्या प्रचारसभेत लांडे बोलत होते. या वेळी ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मोहिनी लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक समीर मासुळकर, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक पंडित गवळी, मोहम्मद पानसरे, जालिंदर शिंदे, सतीश भोसले, गणपत आहेर, सतीश थिटे, संदिपान झोंबाडे, भरत लांडगे, ईश्वर ठोंबरे, दत्ता गव्हाणे उपस्थित होते.

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत खोट्या आश्वासनाला बळी पडून दैवतासमान विलास लांडे यांच्याविरोधात काम केले. त्या चुकीबद्दल मी माफी मागतो; तसेच प्रायश्‍चित्त करण्यासाठी व हिशोब चुकता करण्यासाठी निवडणुकीत लांडे यांना निवडून आणणारच.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Bhosari vilas lande politics