Vidhan Sabha 2019 : नेत्यांच्या भाजपप्रवेशामुळे शहर काँग्रेसला खिंडार

पिंपरी - शिवाजीनगर, कॅंटोन्मेंट आणि कोथरूडमधील काँग्रेसच्या माजी उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पिंपरी - शिवाजीनगर, कॅंटोन्मेंट आणि कोथरूडमधील काँग्रेसच्या माजी उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

विधानसभा 2019 : पुणे - काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक सुधीर जानज्योत, आनंद छाजेड, खडकी कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शहर काँग्रेसला खिंडार पडले असून कोथरूड, शिवाजीनगर व पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पिंपरी प्रचारासाठी आले होते. तेथे हा प्रवेश झाला. या वेळी खासदार संजय काकडे, पुणे शहर भाजपचे सरचिटणीस गणेश बिडकर, शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपुत्र माजी नगरसेवक आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहू बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. काँग्रेसमधील या नेत्यांच्या प्रवेशामुळे कोथरूड, शिवाजीनगर व पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघांतील भाजपची ताकद आता आणखी वाढली आहे. परिणामी, भाजपचे उमेदवार चांगल्या मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान सदानंद शेट्टी, सुधीर जानज्योत यांनी रात्री उशिरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. शेट्टी यांच्या पत्नी सुजाता शेट्टी या काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका आहे. कॅंटोन्मेंट मतदारसंघातून महाआघाडीकडून रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या शेट्टी यांनी बंडखोरी करीत पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. शेट्टी हे भाजपमध्ये गेल्याने कसबा आणि कॅंटोन्मेंट मतदारसंघात भाजपला फायदा होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com