Vidhan Sabha 2019 : मोदी आज काय बोलणार?

Narendra-Modi
Narendra-Modi

विधानसभा 2019 : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा पुण्याला भेट दिली. त्या कार्यक्रमात मोदी यांनी पुणेकरांपुढे विकासाचे मॉडेल मांडले. उद्या (ता. १७) येथे होणाऱ्या सभेत मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांच्या भाषणातील मुद्दे आणि वस्तुस्थितीचा आढावा. 

मोदी काय म्हणाले?
ज्ञानसंगम (४ जानेवारी २०१५)

    बॅंकिंग क्षेत्राची घडी बसवणार.
    आर्थिक विकासाचा दर पुढे नेणार. 

स्मार्ट सिटी प्रकल्प वर्षपूर्ती (२५ जून २०१६) 
    शहरे सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी आवश्‍यक.  
    पुणे हे देशात सर्वोत्तम शहर म्हणून नावारूपाला येईल. 

सिरम इन्स्टिट्यूट भेट आणि आंतरराष्ट्रीय ऊस परिषद (१३ नोव्हेंबर २०१६)
    देशाला कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने नेणार.
    नोटबंदीनंतर दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्ववत व्हावेत, यासाठी प्रयत्न.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो भूमिपूजन (१८ डिसेंबर २०१८)
    येत्या वर्षअखेरीस पुण्यात बारा किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल.
    मेट्रोमुळे वाहतूक व प्रगतीचा वेग वाढेल.

वस्तुस्थिती
ज्ञानसंगम (४ जानेवारी २०१५)

    बॅंकिग क्षेत्र अजूनही अडचणीत.
    आर्थिक विकासाचा दर अपेक्षेपेक्षा कमीच.

स्मार्ट सिटी प्रकल्प वर्षपूर्ती (२५ जून २०१६) 
    सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील योजनेची अंमलबजावणी धीम्या गतीने. दृश्‍य परिणाम नाही.
    शहरासाठी आखलेल्या योजना अंमलबजावणीच्या पातळीवर पुढे सरकलेल्या नाहीत.

सिरम इन्स्टिट्यूट भेट आणि आंतरराष्ट्रीय ऊस परिषद (१३ नोव्हेंबर २०१६)
    कॅशलेस व्यवहारांना फारसी गती नाही
    नोटबंदीनंतर बांधकाम, वाहन उद्योगासह लघुउद्योगांना फटका.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो भूमिपूजन (१८ डिसेंबर २०१८)
    अजूनही मेट्रोची कामे सुरूच. 
    शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम दिलेल्या खासगी कंपनीसोबत कराराची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला कधी सुरवात होईल? हा प्रश्‍नच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com