Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांच्या रोड शो ला पावसाची हजेरी, कार्यकर्त्यांचा हिरमोड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

भोसरीमधून निवडणुकीच्या रिंगणात असणारे युतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भोसरीमध्ये आगमन झाले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भोसरी चौकातून सुरु झालेला रोड शो दिघी रोड, सिध्देश्‍वर स्कूल, आळंदी रोड या मार्गे येउन अंकुशराव लांगडे सभागृहाजवळ त्याचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांना भव्य आकाराची शिंदेशाही पगडी देण्यात आली.

विधानसभा 2019 : पिंपरी - मुख्यमंत्र्यांच्या भोसरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोड शो दरम्यान अचानक आलेल्या पावसाने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

भोसरीमधून निवडणुकीच्या रिंगणात असणारे युतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भोसरीमध्ये आगमन झाले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भोसरी चौकातून सुरु झालेला रोड शो दिघी रोड, सिध्देश्‍वर स्कूल, आळंदी रोड या मार्गे येउन अंकुशराव लांगडे सभागृहाजवळ त्याचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांना भव्य आकाराची शिंदेशाही पगडी देण्यात आली. 

रोड शो ला सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी उड्‌डाणपुलावरुन पुष्पवृष्टी केली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे काही कार्यकर्त्यांनी रोड शोमधून काढता पाय घेतला. रोड शोमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये महिला वर्गाची संख्या मोठी होती. 

वाहने घसरण्याचे प्रकार 
उड्‌डाणपुलावरुन करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीमुळे भोसरी चौकातील रस्तावर मोठ्या प्रमाणात फुलांच्या पाकळ्या पडल्या होत्या. पावसाच्या पाण्यामुळे त्या ओल्या झाल्यामुळे रस्तावर निसरडे झाले होते, त्यावरुन दुचाकी वाहने घसरण्याचे यावेळी झाले. दरम्यान, रोड शो सुरु झाल्यानंतर भोसरी चौकातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. दिघी रोडकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती, त्यामुळे वाहतूक पोलिस आणि वाहनचालक यांच्यामध्ये वाद होतानाचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 chief minister road show rain Politics