Vidhan Sabha 2019 : चिंचवड : डॉ. कोल्हेंच्या पदयात्रेने चिंचवडचे रणांगण तापले

काळेवाडी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार  राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रॅली काढली.
काळेवाडी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रॅली काढली.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘चिंचवड विधानसभा मतदार संघाला केवळ शाश्‍वतच नव्हे तर समतोल विकासाची आस आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळून तसेच प्रत्येकाला विश्‍वासात घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी राहुल कलाटे हे सर्वार्थाने सार्थ उमेदवार असून जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे,’’ असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १७) काळेवाडी परिसरात कोल्हे यांची पदयात्रा झाली. अपक्ष उमेदवार कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते कलाटे यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले असताना कोल्हे यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला. सर्वपक्षीय नेत्यांनीही या पदयात्रेत सहभाग नोंदविला.

कोल्हे म्हणाले, ‘‘पाण्यासारख्या मूलभूत प्रश्‍नापासून रोजगारापर्यंतचे अनेक प्रश्‍न या मतदार संघात प्रलंबित आहेत. दहा वर्षे एकाच हातात सत्तेची सूत्रे असल्याने विकास कामांना मरगळ आली आहे. मतदार संघात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. ही गरज राहुल कलाटे यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.’’

दरम्यान, कलाटे यांनी वाकड परिसरात रॅली काढली. युवकांचा त्यात मोठा सहभाग  होता. ‘विकासाची चाहूल, फक्त राहुल’, अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रॅलीमुळे वाकड परिसरातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com