Vidhan Sabha 2019 : चिंचवड : चिंचवड मतदारसंघात शाश्‍वत विकास - नीता पाडाळे

चिंचवड - महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडी परिसरात पदयात्रा काढली. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.
चिंचवड - महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडी परिसरात पदयात्रा काढली. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात केलेला विकास हा सर्वसामान्यांचा विकास आहे. सर्व सुविधा पुरविल्या आहेत. मतदारसंघात शाश्‍वत विकास करण्याच्या निश्‍चयाने त्यांची वाटचाल सुरू आहे,’’ असे प्रतिपादन नगरसेविका नीता पाडाळे यांनी केले. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवेसना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडीमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. काळेवाडी पुलाजवळील लकी बेकरी येथून या पदयात्रेला सुरवात झाली. मुख्य रस्त्याने ज्योतिबा मंगल कार्यालय, पाचपीर चौकापासून रहाटणी फाट्यापर्यंत ही पदयात्रा काढली. यामध्ये नगरसेविका नीता पाडाळे, माजी नगरसेविका ज्योती भारती, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, प्रभाग स्वीकृत सदस्य देवीदास पाटील, विनोद तापकीर, ललिता पाटील, छाया पाटील, धर्मा पवार, सुरेश पाटील, विलास पाडाळे, सोमनाथ तापकीर, पुष्पा नढे, किरण नढे, प्रतिभा ताम्हणकर, कल्पना काकुळदे, विशाल वाळके, भरत ठाकूर, कैलास सानप, प्रदीप शिंदे, काळूराम नढे, विलास नढे, बजरंग नढे, आकाश भारती सहभागी झाले होते. या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

ताम्हणकर म्हणाले, ‘‘जगताप यांनी सामान्य जनतेला काय हवे, याची जाणीव ठेवून मतदारसंघात काम केले आहे. या कामाचे रूपांतर चिंचवड मतदारसंघाच्या विकासात झाले आहे. मतदारसंघातील प्रश्‍न त्यांनी सरकार दरबारी मांडले. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यात त्यांना यश आले. लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे चिंचवड मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com