Vidhan Sabha 2019 : चिंचवड : लक्ष्मण जगतापांमुळे चिंचवडचा विकास - श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

‘पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर, सब-वे आणि इतर सुविधा निर्माण करून नागरिकांचा प्रवास विनाअडथळा जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. या सर्व कामांमुळे नागरिकांची वेळेसोबतच इंधनाचीही बचत झाली आहे.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर, सब-वे आणि इतर सुविधा निर्माण करून नागरिकांचा प्रवास विनाअडथळा जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. या सर्व कामांमुळे नागरिकांची वेळेसोबतच इंधनाचीही बचत झाली आहे. या सर्व कामांमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. तसेच, त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठा विकास केला आहे,’’ अशा शब्दांत खासदार श्रीरंग बारणे यांनी गौरव केला. चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त थेरगावमध्ये आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. 

बारणे म्हणाले, ‘‘अनेक मोठे प्रकल्प राबविल्याने या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. विकासशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील नागरिकांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक महत्त्वाचे बीआरटी रस्ते तयार केले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे अभियंते, कामगारांची राहण्यासाठी चिंचवड मतदारसंघाला नेहमी पसंती राहिली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आमदार म्हणून जगताप कुठेही कमी पडल्याचे चित्र नाही. स्मार्ट सिटी, नदी सुधार, झोपडपट्ट्यांचा विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पुढील पाच वर्षांत विकासकामांच्या बाबतीत चिंचवड मतदारसंघाची ओळख एक चांगला मतदारसंघ म्हणून निर्माण होईल, त्यासाठी जगताप पुन्हा आमदार झाले पाहिजेच. त्यांच्या विजयासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 chinchwad laxman jagtap shrirang barane politics