Vidhan Sabha 2019 : काँग्रेसमधील ‘इनकमिंग’ने भाजप जोरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

शिवाजीनगर-खडकी परिसरातील अनेक नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना त्याचा फायदा होणार आहे.

विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर-खडकी परिसरातील अनेक नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना त्याचा फायदा होणार आहे.

माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद चंद्रकांत छाजेड, माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे, समाधान शिंदे, हरीश आबा निकम, खडकी कॅंटोन्मेंटचे नगरसेवक सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत, उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू बालवडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते दादा कचरे, तुकाराम जाधव आदींनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. 

यापैकी अलगुडे यांचे वडारवाडीमध्ये मोठे काम असून, गेली अनेक वर्षे ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे शिरोळे यांची वडारवाडी परिसरात स्थिती मजबूत झाली. दुसरीकडे छाजेड हे राजकीय कुटुंबही काँग्रेसचे निष्ठावान कुटुंब म्हणून ओळखले जाते. 
खडकी कॅंटोन्मेंटमध्येही आजवर काँग्रेसचा कायम प्रभाव राहिलेला दिसून येतो; पण हरीश आबा निकम, कांबळे, चासकर, सावंत, भापकर यांच्या एकत्रित भाजपप्रवेशामुळे कॅंटोन्मेंटमधील काँग्रेसच्या मतपेटीला सुरुंग लागण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी सायंकाळी सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयास भेट देत सिद्धार्थ आणि त्यांच्या प्रचारात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत प्रचाराचा आढावा घेतला आणि काही सूचना दिल्या. बुधवारी सायंकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट 
सोमय्या यांनी शिरोळे यांच्या कार्यालयास भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 congress bjp incoming politics