Vidhan Sabha 2019 : काँग्रेसला जागा दिली नाही - साठे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

महाआघाडी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनपैकी एकही जागा न सोडल्याबद्दल काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली; तसेच या तीन मतदारसंघांत एखाद्या उमेदवाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय ‘राष्ट्रवादी’ने परस्पर घेतल्यास तो निर्णय आमच्यावर बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - महाआघाडी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनपैकी एकही जागा न सोडल्याबद्दल काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली; तसेच या तीन मतदारसंघांत एखाद्या उमेदवाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय ‘राष्ट्रवादी’ने परस्पर घेतल्यास तो निर्णय आमच्यावर बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट केले. 

चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही मतदारसंघापैकी एकतरी जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मी खूप प्रयत्न केले. मात्र, एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही. दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’नेही उमेदवार दिला नाही. त्यामुळे खूप नाराज आहे, असे साठे यांनी सांगितले.

या वेळी पक्षाच्या शहर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ‘राष्ट्रवादी’ने उमेदवारी दिलेले डॉ. अमोल कोल्हे, मावळसाठी पार्थ पवार यांचा मनापासून प्रचार केला. त्यामुळे आम्हाला एकतरी जागा मिळेल, अशी अशा होती. जागा न मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. तसेच राष्ट्रवादीने पिंपरीत नेमकी कोणाला उमेदवारी दिली, हे आम्हाला अधिकृत सांगितले नाही. महाआघाडी असल्याने राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार द्यायला हवा होता. उमेदवार पुरस्कृत करताना चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आवाहनही साठे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Congress Seat Sachin Sathe Politics