भोसरीत लांडगे यांच्यावर मतांची बरसात सुरूच, ४३,५८५ मताधिक्य Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भोसरीत भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर मतांची बरसात सुरूच असून त्यांनी ४३,५८५ इतके मताधिक्य मिळविले आहे. टपाली मतदानातही लांडगे यांचेच वर्चस्व राहिले.

पिंपरी - भोसरीत भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर मतांची बरसात सुरूच असून त्यांनी ४३,५८५ इतके मताधिक्य मिळविले आहे. टपाली मतदानातही लांडगे यांचेच वर्चस्व राहिले. 

१२ व्या फेरी अखेर लांडगे यांना एकूण ९२,२६१ मते पडली आहेत. तर लांडे यांची पिछाडी कायम असून ते विजयाच्या शर्यतीत आणखी मागे पडत चालले आहेत. 
लांडे यांना या फेरी अखेर ४८,६७६ मतेच खेचता आली. 

१२ व्या फेरीत लांडगे यांना ८१६६ मते पडली. तर लांडे यांना त्याच्या निम्मे म्हणजे ४०४१ मतेच मिळविता आली. वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख यांना या फेरी अखेर एकूण ८६९१ मते मिळाली. 

टपाली मतदानातही लांडगे हेच आघाडीवर राहिले. ५७६ टपाली मतदानात ४९१ मते वैध ठरली. तर ८५ मते बाद झाली. त्यात, लांडगे यांच्या मतांचा २७५ इतका वाटा राहिला. लांडे यांना येथेही पिछाडी पहावी लागली. त्यांना १८५ मते मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Election Result Bhosari Mahesh Landage Politics