#SaturdayMotivation : निवडणूक पार पाडण्यासाठी ‘नारीशक्ती’ सज्ज

women power
women power

विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी विविध कक्षांची स्थापना केली असून, निवडणुकीचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणूक कामकाजासाठी १४ हजार ३९६ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मृणालिनी सावंत कामकाज पाहत आहेत. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्‍यामल पाटील-पोवार, योगिता बोडके या पार पाडत आहेत. विभागीय उपायुक्त नयना बोंदार्डे, उपायुक्त साधना सावरकर, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी रूपाली आवले, तहसीलदार मनीषा देशपांडे, मीनल भामरे, नायब तहसीलदार अपर्णा तांबोळी या पुणे विभागातील निवडणूकविषयक कामकाज पाहत आहेत.

निवडणूकविषयक प्रशिक्षणाची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार आणि उपायुक्त वनश्री लाभशेटवार यांच्यावर सोपविली आहे. आचारसंहिता कक्षाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी सुरेखा माने उत्कृष्टरीत्या सांभाळत आहेत. मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ व्यवस्थापन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांच्याकडे आहे. निवडणूकविषयक बैठकांच्या नियोजनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के यांच्यावर आहे.

उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्याकडे मतदार मदत कक्षाच्या नियंत्रण आणि उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्याकडे मतदान साहित्य पुरविण्याची जबाबदारी आहे.

वित्त व लेखा विभागाच्या उपसंचालक पद्मश्री तळदेकर, सार्वजनिक बांधकामाच्या उपअभियंता वर्षा सहाणे, विद्युत विभागाच्या उपअभियंता अनघा पुराणिक व नलिनी सुत्रावे, समाजकल्याण विभागाच्या समन्वयक रोहिणी मोरे, अश्विनी करमरकर, परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी, विधी अधिकारी स्वाती पंडित, तहसीलदार रूपाली रेडेकर, नायब तहसीलदार नेहा चाबुकस्वार, तहसीलदार सुनीता आसवले, माहिती सहायक संचालक वृषाली पाटील आणि नायब तहसीलदार शैलजा तारू या निवडणूक कामकाज पाहत आहेत.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनुक्रमे आरती भोसले, मनीषा कुंभार, वैशाली इंदाणी, रेश्‍मा माळी, अस्मिता मोरे, नीता सावंत-शिंदे या कार्यरत आहेत; तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रमा जोशी, सुचित्रा अमले पाटील, लैला शेख, सोनाली मेटकरी, रूपाली सरनोबत, राधिका बारटक्के, रोहिणी आखाडे, दीप्ती रिठे, रंजना ढोकळे, स्मिता पवार, सुरेखा दिवटे, तृप्ती कोलते-पाटील या महिला अधिकारी कामकाज पार पाडत आहेत. मतमोजणी व्यवस्थापनाचे काम अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवाडे यांच्याकडे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com