Vidhan Sabha 2019 : अपक्षांचा फटका नेमका कुणाला?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी अठरा उमेदवार रिंगणात असून, यामध्ये तब्बल बारा अपक्षांचा समावेश आहे. अधिकृत राजकीय पक्षांकडून सहा जणांना उमेदवारी मिळाली असून, त्यांच्यापुढे अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभागणीचे आव्हान असेल. याचा फटका नेमका कोणाला बसणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

विधानसभा 2019 : पिंपरी - पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी अठरा उमेदवार रिंगणात असून, यामध्ये तब्बल बारा अपक्षांचा समावेश आहे. अधिकृत राजकीय पक्षांकडून सहा जणांना उमेदवारी मिळाली असून, त्यांच्यापुढे अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभागणीचे आव्हान असेल. याचा फटका नेमका कोणाला बसणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

आरक्षित असलेल्या या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी सुरवातीपासूनच इच्छुकांची मोठी संख्या होती. मात्र, महाआघाडी आणि महायुती झाल्याने अनेकांची संधी हुकली. त्यामुळे काहींनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्याने बंडखोरांनी माघार घेतली. यामध्ये बारा जणांचा समावेश होता. त्यामुळे अधिकृत उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, तरीही भाजपच्या एका नगरसेवकाने बंडखोरी करीत अर्ज कायम ठेवला आहे. यासह इतरही उमेदवारांचा समावेश आहे. 

सर्वाधिक उमेदवार पिंपरीत
पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही मतदारसंघांपैकी सर्वाधिक उमेदवार पिंपरी मतदारसंघात आहेत. चिंचवडमध्ये अकरा तर भोसरीत बारा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पिंपरीतच उमेदवाराला मतविभाजनाचा अधिक धोका असल्याचे दिसून येते. 

एक एक मत महत्त्वाचे 
निवडणुकीतील विजयासाठी एक एक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण कमी पडू नये यासाठी उमेदवार शर्थीचे प्रयत्न करतात. अपक्ष उमेदवाराला त्यांच्या जवळची मते मिळाली तरी त्याचा दुसऱ्या उमेदवाराला फटका बसतो, हे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभागणीचा आपल्याला फटका बसेल का, अशी भीती सध्या अधिकृत उमेदवारांना सतावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Independent Candidate Politics