Vidhan Sabha 2019 : मावळ : किन्हई गावाचा कायापालट करेन - सुनील शेळके

किन्हई - महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
किन्हई - महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

विधानसभा 2019 : तळेगाव - किन्हई गावामधील समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. रस्त्यांची दुरवस्था, विजेची, पाण्याची गैरसोय हे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत. पावसाळ्यात तर गावात येणे-जाणे जिकरीचे बनते. वाहतुकीचा खोळंबा होतो.

लोकप्रतिनिधींकडून तीच पुन्हा आश्‍वासने दिली जातात. या गावाचा विकास होणार तरी कधी, असा प्रश्‍न करत मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी गावाच्या विकासासाठी मला एक संधी द्या, गावाचा कायापालट करून दाखवतो, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. 

देहूगाव परिसरातील विविध गावांमधून गुरुवारी (ता. १७) त्यांचा प्रचार दौरा आयोजित केला होता. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, काळोखे मळा आदी भागातून सकाळ आणि दुपारच्या सत्रात शेळके यांनी पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव पिंजण, काँग्रेस सेवादल देहूरोडचे अध्यक्ष पिंजण, उपाध्यक्ष बाळू पिंजण, किन्हई गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पिंजण, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पिंजण, सामाजिक कार्यकर्ते अमित पिंजण, अमोल पवार, विशाल मुंडे उपस्थित होते. शेळके म्हणाले, ‘‘जनतेची ताकद किती मोठी असते हे मी उमेदवारीचा फॉर्म भरताना अनुभवली आहे. जनतेचा माझ्यावरील विश्‍वास सार्थ करून दाखवणार. मला एक संधी दिल्यास मावळ तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करणार. तरुणांना रोजगार देणार आहे. सर्वांना मोफत उपचार देणारे, पुणे जिल्ह्यातील रुग्णालयापेक्षा मोठे रुग्णालय मावळात सुरू करणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com