Vidhan Sabha 2019 : आमदार लांडगे यांचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, चऱ्होलीचे माजी नगरसेवक घनश्‍याम खेडकर, माजी नगरसेविका आशा सुपे, नगरसेविका विनया तापकीर यांचे पती प्रदीप तापकीर, राष्ट्रवादीकडून २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढविलेले संजय पठारे, चिखलीचे सुनील लोखंडे, नीलेश नेवाळे, एस. डी. भालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला वेळोवेळी डावलले. महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, विधानसभेची उमेदवारी यापासून वंचित ठेवले. आपला केवळ वापर केला त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे ज्येष्ठ नेते वसंत लोंढे यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत आमदार महेश लांडगे यांनी सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले. नवीन समाविष्ट गावांमध्ये विकासाची अनेक कामे केली. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन आमदार महेश लांडगे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 MLA Mahesh Landage NCP BJP Politics