Vidhan Sabha 2019 : ‘मोदी मोदी’चा जयघोष

स. प. महाविद्यालय - विधानसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी, भाजपचे उमेदवार, पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून अभिवादन केले.
स. प. महाविद्यालय - विधानसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी, भाजपचे उमेदवार, पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून अभिवादन केले.

विधानसभा 2019 : पुणे - सत्ताधारी-विरोधकांमधील डावपेचांनी राजकीय मैदानात गाजत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर कशी आगपाखड करणार ? या उत्सुकतेपोटी भाजपच्या कार्यकर्त्यांसह पुणेकरांनीही मोदींच्या सभेला हजेरी लावली. विरोधकांना इशारे देताना पंतप्रधान मोदींनी थेट संवाद साधून गर्दीचा उत्साह वाढविला आणि गर्दीतून ‘मोदी मोदी’चा नारा घुमत राहिला. तेव्हाच आपल्या ‘स्टाईल’मध्ये उपस्थितांची फिरकी घेत, पुणेकरांची मने आणि मैदानही जिंकण्याची संधीही मोदी यांनी साधली. 

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील मोदी यांच्या सभेला भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, पाऊस आणि गर्दीचा अंदाज घेऊन सभेच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, खुर्च्या आणि जागोजागी स्क्रीन बसविल्याने पुणेकरांसाठी ही राजकीय सभा ‘कार्पोरेट इव्हेंट’ ठरली. मोदी यांचे आगमन झाल्याचे जाहीर होताच ‘मोदी, मोदी’ या घोषणांनी मैदान दणाणून निघाले. पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच उपस्थितांनी मोबाईलमधील ‘टॉर्च’  लावून त्यांचे स्वागत केले. मराठीत भाषणाची सुरवात करीत मोदींनी ‘काय पुणेकर, कसे आहात’ अशी आस्थेने विचारपूस केली. ‘येत्या २१ तारखेला काय आहे,’ असे विचारले, तेव्हा,‘व्होटिंग’ असल्याचे लोकांनी सांगितले. परंतु, २१ तारखेला सोमवार असल्याचे मोदींनी सांगितले आणि मैदानावर जोरदार हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com