Vidhan Sabha 2019 : चिंचवडमधून जगताप, भोसरीतून लांडगेंना संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भारतीय जनता पक्षाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार व पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांचे वादळ शांत राहणार की बंडखोरी होणार याबाबतच्या चर्चेला उधान आले आहे.

विधानसभा 2019 : पिंपरी - भारतीय जनता पक्षाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार व पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांचे वादळ शांत राहणार की बंडखोरी होणार याबाबतच्या चर्चेला उधान आले आहे. कारण, भोसरीतून भाजपचे महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक रवी लांडगे यांनीही उमेदवारी मागितली होती. रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज सोमवारी नेले आहेत. तर, चिंचवडमधून उपमहापौर भाजपचे सचिन चिंचवडे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनीही उमेदवारी मागितली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Pimpri Chinchwad Constituency Jagtap and Landage BJP Politics