Vidhansabha 2019 : राजकीय पक्षांनी फुंकले रणशिंग

Politics
Politics

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी महिनाभरचा कालावधी मिळणार आहे. विधानसभेच्या या लढाईसाठी आम्ही तयार आहोत. पक्षाची यंत्रणा कामाला लावली असून, प्रत्येकाला जबाबदारीचे वाटपही केले आहे. आता मतदारांशी संपर्क साधून प्रचाराचे काम शिल्लक आहे, असे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. 

माधुरी मिसाळ (शहराध्यक्षा, भाजप) - भाजपची बूथ कमिटी, शक्ती केंद्रांची यंत्रणा तयार आहे. प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदाराशी संपर्क साधला जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य सरकार व केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर केलेल्या कामाची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. यासाठी २५ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर या काळात महाजनसंपर्क यात्रेचे आयोजन केले आहे. 

रमेश बागवे (शहराध्यक्ष, काँग्रेस) - काँग्रेसने बूथ, प्रभाग आणि विधानसभा मतदारसंघांत समित्या गठित करून कार्यकर्त्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. प्रत्येक मतदासंघासाठी प्रमुख नेमणार आहोत. सोशल मीडियावरूनही प्रचार केला जाणार आहे. शिवाजीनगर, कसबा आणि कॅंटोन्मेंट या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 

चेतन तुपे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) - आचारसंहिता लागू होण्याच्या एक महिना आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. मतदरासंघनिहाय मेळावे व बैठका झाल्या आहेत. आता प्रभागनिहाय मेळावे घेतले जाणार आहेत.

संजय मोरे (शहरप्रमुख, शिवसेना) - गेल्या आठवड्यात सर्व मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. गट प्रमुखांची यंत्रणाही तयार आहे.  

अजय शिंदे (शहराध्यक्ष, मनसे) - आम्ही निवडणूक लढवायची की नाही, याबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. याबाबत मुंबईत आज बैठक सुरू आहे. मात्र निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com