Vidhan Sabha 2019 : जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी

Voting
Voting

विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा उपनिवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. मतदान साहित्य वितरण, मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम, दिव्यांग मतदारांना सुविधा, मतदान केंद्राचे वेब कास्टिंग, मतदार चिठ्ठ्यांचे वाटप, ईव्हीएम मशिनची उपलब्धता, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, सी-व्हिजील, मतमोजणीची व्यवस्था, मतदान केंद्र उभारणी, मतदान केंद्रावरील सुविधा या विषयाचा आढावा या वेळी 
घेण्यात आला.

मतदानासाठी लागणाऱ्या साहित्य वितरणाचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात यावे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे काळजीपूर्वक हाताळावीत, प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर मॉक पोल काळजीपूर्वक करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे राम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com