Vidhan Sabha 2019 : पुरंदर : मंत्री विजय शिवतारेंसमोर आघाडीचे भक्कम आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार आणि मंत्री विजय शिवतारे पुरंदर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी भक्कम आव्हान उभे केले आहे. आघाडी झाल्यापासून पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे.

विधानसभा 2019 : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार आणि मंत्री विजय शिवतारे पुरंदर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी भक्कम आव्हान उभे केले आहे. आघाडी झाल्यापासून पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढलाय, तर शिवसेनेची भिस्त मंत्रिपदाच्या काळातील विकासकामांवर आहे. एरवी तिरंगी, चौरंगी लढत होत असे. यंदा सरळ लढत असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

विजय शिवतारे
बलस्थाने

    मंत्रिपदामुळे अनेक विकासकामे. 
    दहा वर्षांपासून मतदारसंघात सर्वदूर संपर्क. 
    गुंजवणी धरणाचे काम पूर्ण, विमानतळासाठी प्रक्रिया सुरू. 
    जेजुरी ‘एमआयडीसी’च्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा.

उणिवा
    विमानतळासाठीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध.
    गुंजवणी धरणाचे पाणी अद्याप मिळालेले नाही.

संजय जगताप
बलस्थाने

    राष्ट्रवादीचे भक्कम पाठबळ. 
    सहकार क्षेत्रातील अनेक संस्था ताब्यात. 
    राजकीय पार्श्‍वभूमी असलेला कौटुंबिक वारसा. 
    तालुक्‍यामध्ये १५ वर्षांपासून सक्रिय.

उणिवा
    राष्ट्रवादीचा एक गट प्रचारापासून अलिप्त.   
    नगरपालिकेतील काही विकासकामांबाबत नाराजी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 purandar vijay shivtare sanjay jagtap politics