Vidhan Sabha 2019 : जनतेची इच्छा पूर्ण करू - राहुल कलाटे

वाकड - रोड शोदरम्यान मतदारांना अभिवादन करताना राहुल कलाटे.
वाकड - रोड शोदरम्यान मतदारांना अभिवादन करताना राहुल कलाटे.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘नदीपात्रात, पूररेषेत अतिक्रमणे झाली आहेत. सांडपाणी नदीत सोडले जात आहे. नदी संवर्धनाचा दिखावा केला जात आहे. नदी बचावचे साकडे नागरिक घालत आहेत. त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करू,’’ असे मत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.

रविवार सुटीचे औचित्य साधत कलाटे यांनी दुचाकी रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यादरम्यान त्यांनी अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नावरून निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘सत्तेसाठी बेडूक उड्या मारणाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम प्रश्‍नाचा कांगावा केला. भाजपची एकहाती सत्ता असूनही प्रश्‍न सोडविता आलेला नाही. साधी वीटही अधिकृत झाली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी शास्ती कर माफीसाठी मोर्चे काढत नौटंकी केली. सरसकट शास्ती माफी नसताना विद्यमान आमदार मूग गिळून आहेत. खरंच त्यांना कळवळा असता तर पक्षाविरोधात आंदोलनाची धमक दाखविली असती; परंतु त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. ज्यांना स्वतःची शाळा वाचविता आली नाही ते सर्वसामान्यांची बांधकामे काय वाचविणार?’’ सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी भागातील बांधकाम व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे. पाणी टंचाईच्या नावाखाली व्यावसायिकांना वेठीस धरले जाते. मग, सर्वसामान्यांचे काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com