Vidhan Sabha 2019 : सुनील कांबळे यांची प्रचारासाठी मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात प्रचारासाठी सुनील कांबळे यांनी मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार असलेल्या कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.

विधानसभा 2019 : कॅंटोन्मेंट - पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात प्रचारासाठी सुनील कांबळे यांनी मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार असलेल्या कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.

कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला प्रत्येक भाग, समाज आणि प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. भाजपच्या ज्येष्ठांसह तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेल्या या नियोजनात प्रत्येक तासाचा कार्यक्रम आखला आहे. मतदारसंघामधील प्रत्येक भागातील मतदारांसमोर कांबळे स्वतः पोचतील, अशी यंत्रणा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ३ आणि नंतर दुपारी ४ ते १० असा दररोज दोन टप्प्यात प्रचार चालणार आहे. भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा, पक्ष संघटना आणि विविध आघाड्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पदयात्रा किंवा प्रचारादरम्यान बुथप्रमुख, पन्नाप्रमुख यांनाही या यंत्रणेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

ज्येष्ठ बंधू आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाच्या झालेल्या विकासात आणखी भर घालण्याचा मानस असून त्यासाठी येथील जनता आपल्या पाठीशी आहे, असा विश्‍वास सुनील कांबळे यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्‍चित आहे. किती मताधिक्‍याने विजय होणार?, याचीच गणिते सामान्य नागरिक सध्या बांधत असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Sunil Kamble Promotion Politics