Vidhan Sabha 2019 : वाहतूक कोंडी, रोजगाराच्या मुद्द्याला प्राधान्य

Politics
Politics

विधानसभा 2019 : पुणे - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, नेटके सुनियोजित नगरनियोजन, रोजगार आदी मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने या निवडणुकीत प्राधान्य दिले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर असल्याचे तिन्ही पक्षांनी म्हटले आहे.

या तिन्ही पक्षांनी शहरासाठी स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले नसले, तरी शहर विकासासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित केला आहे. प्रचारादरम्यान पक्षाचा भर कोणत्या मुद्द्यांवर असेल, याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी, मनसेचे उपनेते बाबू वागस्कर आणि ‘आप’चे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी दिली. वंचितने सात, तर मनसेने पाच जागांवर आणि ‘आप’ने चार मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी - (चिन्ह - सिलिंडर)
    युवकांना रोजगार मिळवून देणे 
    शहर, उपनगरांत पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करणे 
    पर्यावरणाचे संतुलन राखताना प्रदूषण कमी करणे
    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी  
    धर्म, जातीच्या नावाखालील हिंसाचार रोखण्यासाठी सलोखा निर्माण करणे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - इंजिन 
    वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना, सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी 
    शहराचे नेटके नियोजन करून सुविधा उपलब्ध करून देणे  
    पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन 
    झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांचे मालकी हक्काचे घर 
    प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे संतुलन, टेकड्या अतिक्रमणमुक्त करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com