Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरी : विकासकामांमुळेच मुळीक यांचे नाव - बापू पठारे

वडगाव शेरी - विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ फुलेनगर, इंदिरानगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती.
वडगाव शेरी - विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ फुलेनगर, इंदिरानगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती.

विधानसभा 2019 : वडगाव शेरी - वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ते विकासकामांमुळे तळागळातील नागरिकांपर्यंत पोचले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार हे जगदीश मुळीकच आहे. त्यामुळे पुन्हा मुळीकच निवडून येणार असल्याचा विश्‍वास माजी आमदार बापू पठारे यांनी व्यक्त केला.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ फुलेनगर, मेंटल कॉर्नर, शांतिनगर, प्रतीकनगर, जाधवनगर, इंदिरानगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती. या वेळी पठारे बोलत होते. 

या प्रसंगी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, शीतल सावंत, अजय सावंत, फरजाना शेख, चंद्रकांत जंजिरे, संजय कदम, भगवान जाधव, पप्पू गोगले, सागर माळकर, आनंद गोयल, मंगेश गोळे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

पठारे म्हणाले, ‘‘वडगाव शेरीच्या विकासाला जगदीश मुळीक यांना गती दिली. वेगवेगळे प्रकल्प राबविल्याने त्यांना वडगाव शेरी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’’ विरोधकांना उद्देशून मुळीक म्हणाले, ‘‘जे एका पक्षाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार आहे. निवडणुका आल्यानंतर स्वार्थासाठी अनेकजण पक्ष बदलतात. नागरिकांच्या विकासापेक्षा स्वतःच्या विकासाची काळजी असणाऱ्यांना जनता घरी बसवेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com