Vidhan Sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर

Money
Money

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित बैठकीत राम म्‍हणाले, २१ मतदारसंघांतील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घेतली आहे. तसेच, प्राप्तिकर विभाग, बॅंकांचे अधिकारी, खर्च नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. उमेदवारांच्या सभा, रॅलीसाठी व्हिडिओ ग्राफर्सना प्रशिक्षण दिले आहे. ‘सी-व्हिजिल’ ॲपवरील तक्रारींवर कार्यवाही करण्यात येत आहे. पेड न्यूज आणि माध्यम प्रमाणीकरणाबाबत समिती कार्यरत आहे. जिल्ह्याचा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार असून, सर्व यंत्रणा सज्ज आहेत. निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अजित रेळेकर यांनी सहकारी बॅंका, पतसंस्थांमार्फत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असे सांगितले.

या वेळी केंद्रीय खर्च निरीक्षक अमलेंदू नाथ मिस्रा, रोहित मेहरा, किरण कट्टा, विजय चौधरी, पीयूष मुखर्जी, अमरसिंग मेहरा, सैलेन समाद्दर, रोशन लाल तसेच सह पोलिस आयुक्‍त रवींद्र शिसवे, पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष प्रमुख अजित रेळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील टोलनाक्‍यांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यात येत आहे. बेकायदा मद्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे.
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com